स्पेंग्लरच्या दृष्टान्ताचे भूत
एका वेगळ्या युगात ऑस्वॉल्ड स्पेंग्लरने वर्तवलेले भाकित प्रसिद्ध आहे. तो द डिक्लाइन ऑफ द वेस्ट मध्ये म्हणाला “व्यक्तिमाहात्म्य, उदारमत, लोकशाही, मानवतावाद आणि स्वातंत्र्य यांचे युग संपत आले आहे.” स्पेंग्लर नव्वदेक वर्षांपूर्वी लिहीत होता, पहिल्या महायुद्धानंतर, जर्मनीला अपमानकारक व्हर्सायच्या तहानंतर, आणि महामंदीच्या सुरुवातीच्या काळात. तो म्हणाला, ” (जनता) शरणागत भावाने बलवानांचा, सीझरांचा विजय मान्य करेल, आणि …